तुम्हालासुद्धा आहे Acidity चा त्रास तर खालील लेख अवश्य वाचा.

         मित्रांनो आजकाल Acidity नावाचा प्रकार खुप सामान्य गोष्ट होऊन बसला आहे, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत हा आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. हा आजार होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार पद्धतीत झालेला अमुलाग्र बदल होय. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड नावाचा प्रकार सर्वच खाण्यात वापरतांना दिसत आहेत, त्यामुळे शरीराचे पोषण कमी आजाराला आमंत्रण जास्त अशी परिस्थिती स्वतः आपण आपल्या भोवती निर्माण करत आहोत. Acidity नेहमी होणे हे आरोग्यासाठी खुप हानिकारक ठरू शकते.
Acidity होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी:-
१) आहारात आंबट पदार्थाचा समावेश करू नये. जसे की दही, टोमॅटो, चिंच इत्यादी.
२) सकाळची न्याहारी शक्यतो ८ वाजेच्या आताच करणे योग्य असते.
३) सकाळची न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये कमीतकमी ५ तासाचे अंतर असणे आवश्यक असते आणि ते अंतर ठेवणे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते.
४) दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात हल itक्या अन्नाचा समावेश करणे अती उत्तम गोष्ट आहे.
५) रात्रीच्या वेळी धूम्रपान करणे टाळावे.
६) रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने सुद्धा Acidity होण्याची दाट शक्यता असते म्हणून शक्यतो जागरण टाळावे.
७) हॉटेल मधील तेलकट पदार्थाचे सेवन करणे तत्काळ थांबवणे योग्य राहील. या पदार्थामुळे सुद्धा acidity नावाचा प्रकार जास्त उद्भवल्याचे दिसून येत आहे.
८) रोज सकाळी ब्रश केल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी सेवन केल्याने acidity होत नाही.
९) तळलेले पदार्थ acidity होण्यास कारणीभूत असतात त्यामुळे अश्या पदार्थाचे सेवन शक्यतो टाळावे.
१०) सकाळी योगासने केल्याने ( पोटासमंधित व्यायाम केल्याने) सुद्धा acidity कमी करण्यात मदत होते.

Third party image referen

Comments