Posts

Showing posts from October, 2019

तुम्हालासुद्धा आहे Acidity चा त्रास तर खालील लेख अवश्य वाचा.

Image
         मित्रांनो आजकाल Acidity नावाचा प्रकार खुप सामान्य गोष्ट होऊन बसला आहे, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत हा आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. हा आजार होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार पद्धतीत झालेला अमुलाग्र बदल होय. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड नावाचा प्रकार सर्वच खाण्यात वापरतांना दिसत आहेत, त्यामुळे शरीराचे पोषण कमी आजाराला आमंत्रण जास्त अशी परिस्थिती स्वतः आपण आपल्या भोवती निर्माण करत आहोत. Acidity नेहमी होणे हे आरोग्यासाठी खुप हानिकारक ठरू शकते. Acidity होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी:- १) आहारात आंबट पदार्थाचा समावेश करू नये. जसे की दही, टोमॅटो, चिंच इत्यादी. २) सकाळची न्याहारी शक्यतो ८ वाजेच्या आताच करणे योग्य असते. ३) सकाळची न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये कमीतकमी ५ तासाचे अंतर असणे आवश्यक असते आणि ते अंतर ठेवणे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते. ४) दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात हल itक्या अन्नाचा समावेश करणे अती उत्तम गोष्ट आहे. ५) रात्रीच्या वेळी धूम्रपान करणे टाळावे. ६) रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने सुद्धा Acidit

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळवा कर्ज तेही सवलतीसह

Image
    आपल्या राज्यात वाढत चालली बेरोजगार तरुणांची संख्या ही खुप चिंतेची बाब बनली आहे अश्यातच सरकारी नोकरीची घटती संख्या त्यामुळे सुशिक्षित तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय निर्मितीची एक संधी निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम" दिनांक ०३/०८/१९  ला घोषित केला ज्याद्वारे होतकरू तरुणांना नामांकित संस्थेद्वारे उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगासाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.       तेव्हा जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबंधित योजनेचा शासन निर्णय वाचवा व उद्योग जगतात प्रवेश करून आपल्या जीवनात प्रगती साधावी. मराठी तरुण हा उद्योग व्यवसायात नेहमीच पिछाडीवर राहिला आहे परंतु ही नामी संधी आता चालून आली आहे या योजनेतंर्गत ५० लखार्यंत कर्ज मिळण्याची तरतूद शासनाने केली आहे, विशेष म्हणजे यामध्ये आपण जर ग्रामीण भागात उद्योग सुरू करत असाल तर ३५% सबसि डी मिळते.. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता http