इंडियन आर्मी भरती 2020

 खालील जिल्ह्यातील मुलांनी परभणी येथे होणाऱ्या सैन्य भरती साठी जाव

नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी १८ नोव्हेंबरपासून खुली  सैन्य भरती

भारतीय आर्मी मध्ये भरती होणार आहे. नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठी ही भरती आहे.

१८ नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबर पर्यंत ही खुली सैन्य भरती (खुली सैन्य भरती = Open Army Recruitment Rally ) केली जाणार आहे.


महत्वाचे – imp :- - 

भरतीचे ठिकाण :- पोलीस मुख्यालय, परभणी

या एकाच ठिकाणी वर सांगितलेल्या सगळ्या जिल्ह्यातील तरुणांच्या भरत्या केल्या जाणार आहेत.

वेगवेगळ्या जिल्ह्यात ही भरती नाही.

उदा. मी बुलढाण्याचा रहिवासी आहे. तर मला भरतीसाठी परभणीलाच जावे लागेल. परभणीमध्ये २१ नोव्हेंबर ला बुलढाणेकरांची भरती होणार आहे.


जर मी वर सांगितलेल्या नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्याचा रहिवासी असेल तर?

तर जाहिरातीत सांगितल्यानुसार आम्हाला असे वाटते की तुम्हाला या भरतीत घेतले जाणार नाही.


उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. थेट भरतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे.


 *भरतीच्या जिल्हावार तारखा पुढीलप्रमाणे : - -

१८ नोव्हेंबर - नंदुरबार व हिंगोली जिल्हा,

१९ नोव्हेंबर - जालना जिल्हा,

२० नोव्हेंबर - नांदेड जिल्हा,

२१ नोव्हेंबर - बुलढाणा जिल्हा,

२३ नोव्हेंबर - परभणी जिल्हा,

२४ नोव्हेंबर - औरंगाबाद जिल्हा,

२५ नोव्हेंबर - धुळे जिल्हा,

२६ नोव्हेंबर - जळगाव जिल्हा* 


पदे : – जनरल ड्युटी सोल्जर, सोल्जर टेक्नीकल, क्लार्क, स्टोअर कीपर (दुकान इ. गोष्टी सांभाळणारा), नर्सिंग सहाय्यक, सोल ट्रेडसमन


वय : – १७.५ – २१ (जनरल ड्युटी साठी) २३ (इतर पदांसाठी)


आता प्रत्येक पदाची पात्रता, वय आणि शारीरिक प्रमाणके पाहू :- -


१. पद जनरल ड्युटी सोल्जर :- - 

वय – १७.५ ते २१ वर्षे

शैक्षणिक पात्रता – इ. १० पास. => दहावीत कमीतकमी ४५% मार्क हवेत. + प्रत्येक विषयात किमान ३३% मार्क पाहिजेत.

शारीरिक चाचणी –

उंची - १६८ सेमी

वजन – ५० किलोग्रॅम

छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)


२. सोल्जर टेक्नीकल :- - 

वय – १७.५ ते २३ वर्षे


शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. फक्त विज्ञान शाखेतील मुलांनाच चान्स आहे. आर्ट आणि कॉमर्स झालेल्यांसाठी हे पद नाही.

=> विषय : physics, chemistry, maths, English हे विषय १२ वीला असायला हवेत.


शारीरिक चाचणी –

उंची – १६७ सेमी

वजन – ५० किलोग्रॅम

छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)


३. सोल्जर क्लार्क/SKT स्टोअर कीपर - 

वय – १७.५ ते २३ वर्षे


शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. कोणतीही शाखा चालेल.

मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.

मात्र ही अजून एक अट पहा

=> विषय : English हा विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.

तसेच गणित/अकाऊंट/book keeping या तीन पैकी कोणताही एक विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.

आणि या दोन्ही विषयांना कमीत कमी ४०% मार्क पाहिजेत.


शारीरिक चाचणी –

उंची – १६२ सेमी

वजन – ५० किलोग्रॅम

छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)


४. सोल्जर नर्सिंग असिस्टंट - 

वय – १७.५ ते २३ वर्षे


शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. केवळ विज्ञान शाखा चालेल.

मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.

=> विषय : physics, chemistry, biology, English


शारीरिक चाचणी –

उंची – १६७ सेमी

वजन – ५० किलोग्रॅम

छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)


५. सोल्जर ट्रेडस्-मन - 

वय – १७.५ ते २३ वर्षे


शैक्षणिक पात्रता – इ. ८ वी किंवा १० वी पास


शारीरिक चाचणी –

उंची – १६८ सेमी

वजन – ४८ किलोग्रॅम

छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)


टॅटू बाबत महत्वाची सूचना :- - 

ज्यांच्या शरीरावर परमानंट टॅटू आहेत, त्यांना भरती मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

मात्र हाताच्या आतल्या भागावर (inner face of arm) किंवा तळहाताच्या मागे (back of palm) जर छोटासा धार्मिक (देवाचा वगैरे) टॅटू/नाव काढला असल्यास तो चालेल.


कागदपत्रे काय काय आणावीत? :- -

१६ नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ फोटो

१०/१२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सनद)

रहिवासी प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र => ओपन मधील मुलांनी सरपंचाचा दाखला आणावा. इतरांनी त्यांना नियमानुसार मिळणारे जात प्रमाणपत्र आणावे.

चारित्र्य प्रमाणपत्र (character certificate)

शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड

सरपंच दाखला

पोलीस पाटील दाखला

NCC आणि खेळातील प्रमाणपत्र

Comments